Narishakti Doot APK v1.1.0 Download For Android 2024
Ladki Bahin Yojana :- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे . लाडकी बहीण योजने मार्फत 21 वर्ष ते 65 वर्ष वय असणाऱ्या महिलांना महिन्याला 1500 रु. हे देण्यात येणार आहेत . या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे भरणे सुरू आहे . याची सविस्तर माहिती खाली उपलब्ध करून दिली आहे.
योजनेचे नाव | “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभ | रु. 1500 प्रती महिना |
अर्ज करण्यासाठी App डाउनलोड | Narishakti Doot |
हमीपत्र | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक सहाय व त्यांचे आरोग्य जपण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरवात केली आहे. याचे ऑनलाइन अर्ज हे Narishakti Doot या App वरुण भरायचे आहेत.
योजनेची उद्दिष्टे
लाडकी बहीण योजनेची खालील प्रमाणे उद्दिष्टे आहेत .
- महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यात सुधारणा करणे .
- महिलांच्या पोषणात सुधारणा करणे .
- कुटुंबातील महिलांची भूमिका मजबूत करणे .
- राज्यातील महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे.
लाभ काय मिळणार
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेमद्धे 21 ते 65 वर्ष खालील महिलांना 1500 रु. प्रती महिन्याला लाभ हा मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला / रेशन कार्ड / मतदान कार्ड / अधिवास प्रमाणपत्र / स्वघोषणापत्र (कोणतेही एक )
- उत्पन्न दाखला / रेशन कार्ड (कोणतेही एक )
- बँक पासबूक
- हमीपत्र
Ladki Bahin Yojana Online Registration
- लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स करायच्या आहेत .
- सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये वरील यादी मधील दिलेले सर्व कागदपत्रे याचा फोटो काढून घ्या.
- त्या पुढे तुम्हाला Narishakti Doot हे App Download करायचे आहे. हे App Open करा. व तुम्हाला प्रोफाइल पूर्ण करायची आहे . त्या पुढे तुम्हाला “लाडकी बहीण” योजने साठी ऑनलाइन अर्ज हा करावा लागणार आहे. त्याची माहिती सर्व नीट भरायची आहे .
- अर्ज भरतांना अर्ज बरोबर असल्याची खात्री करा व अर्ज सबमिट करा . त्या तुम्हाला सर्वे नंबर आला असेल त्याची प्रिंट किंवा सर्वे क्रमांक हा पोहच पावती वर लिहून अर्ज हा अंगणवाडी सेविका यांच्या कडे जमा करू शकता .