Ladki Bahin Yojana :- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे . लाडकी बहीण योजने मार्फत 21 वर्ष ते 65 वर्ष वय असणाऱ्या महिलांना महिन्याला 1500 रु. हे देण्यात येणार आहेत . या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे भरणे सुरू आहे . याची सविस्तर माहिती खाली उपलब्ध करून दिली आहे.

योजनेचे नाव“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना
राज्यमहाराष्ट्र
लाभरु. 1500 प्रती महिना
अर्ज करण्यासाठी App डाउनलोडNarishakti Doot
हमीपत्रयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक सहाय व त्यांचे आरोग्य जपण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरवात केली आहे. याचे ऑनलाइन अर्ज हे Narishakti Doot या App वरुण भरायचे आहेत.

लाडकी बहीण योजनेची खालील प्रमाणे उद्दिष्टे आहेत .

  • महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यात सुधारणा करणे .
  • महिलांच्या पोषणात सुधारणा करणे .
  • कुटुंबातील महिलांची भूमिका मजबूत करणे .
  • राज्यातील महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेमद्धे 21 ते 65 वर्ष खालील महिलांना 1500 रु. प्रती महिन्याला लाभ हा मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागणार आहेत.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला / रेशन कार्ड / मतदान कार्ड / अधिवास प्रमाणपत्र / स्वघोषणापत्र (कोणतेही एक )
  • उत्पन्न दाखला / रेशन कार्ड (कोणतेही एक )
  • बँक पासबूक
  • हमीपत्र
  • लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स करायच्या आहेत .
  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये वरील यादी मधील दिलेले सर्व कागदपत्रे याचा फोटो काढून घ्या.
  • त्या पुढे तुम्हाला Narishakti Doot हे App Download करायचे आहे. हे App Open करा. व तुम्हाला प्रोफाइल पूर्ण करायची आहे . त्या पुढे तुम्हाला “लाडकी बहीण” योजने साठी ऑनलाइन अर्ज हा करावा लागणार आहे. त्याची माहिती सर्व नीट भरायची आहे .
  • अर्ज भरतांना अर्ज बरोबर असल्याची खात्री करा व अर्ज सबमिट करा . त्या तुम्हाला सर्वे नंबर आला असेल त्याची प्रिंट किंवा सर्वे क्रमांक हा पोहच पावती वर लिहून अर्ज हा अंगणवाडी सेविका यांच्या कडे जमा करू शकता .